शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

निर्बंध शिथिल; दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहतील दुकाने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 11:15 AM

Unlock Washim : ७ ते दुपारी २ या वेळेत अत्यावश्यक सेवेप्रमाणेच इतरही दुकाने सुरू ठेवण्यास सूट देण्यात आली आहे.

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ९ मे पासून जिल्ह्यात लागू असलेले कडक निर्बंध १ जूनपासून शिथिल झाले आहेत. आता सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत अत्यावश्यक सेवेप्रमाणेच इतरही दुकाने सुरू ठेवण्यास सूट देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी ३१ मे रोजी जारी केले. दुसरीकडे हॉटेल, रेस्टॉरंट, केश कर्तनालय, ब्युटी पार्लर, सार्वजनिक क्रीडांगण, उद्याने, बगीचे, भाजी मार्केट, आठवडी बाजार, गुरांचे बाजार बंदच राहणार आहेत.कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात ९ ते ३१ मे पर्यंत कडक निर्बंध लागू होते. यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तुटण्यास बरीच मदत झाली असून, रुग्णसंख्या घटली आहे. दुसरी लाट ओसरत असल्याचे पाहून कडक निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यानुसार किराणा, फळ, भाजीपाला, पिठाची गिरणी, दूध डेअरी, मांस, अंडी, रेशन दुकाने, कृषी सेवा केंद्र, कृषी उत्पन्न बाजार समिती, आपले सरकार सेवा केंद्र आता सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. दूध डेअरी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत सुरू राहील. घरपोहोच दूध वितरण सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत करता येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व स्वरूपाची दुकाने सोमवार ते शुक्रवार या दरम्यान सकाळी ७ ते दुपारी २ या कालावधीत सुरू राहतील. शनिवार व रविवार या दोन दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्व दुकाने, सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत. हॉटेल, रेस्टॉरंटमधून पार्सल सुविधा!हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ, शिवभोजन थाळी यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहील. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाला हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ, शिवभोजन थाळी केंद्र येथे स्वत: जाऊन पार्सल घेता येणार नाही.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकwashimवाशिम