लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी ‘महाराजस्व अभियान’ राबविले जात असून, सर्वसामान्यांची रेंगाळलेली, प्रलंबित असलेली कामे यामुळे मार्गी लागत आहेत. यंदाही या अभियानास १ ऑगस्टपासून सुरुवात झाली असून, ३१ जुलै २0१८ पर्यंत या अंतर्गत प्रशासनाने कुठली कामे करायची आहेत, यासंदर्भातील निर्देश शासनाने पारित केले आहेत.सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजुरांचा दैनंदिन कामकाजासंदर्भात महसूल प्रशासनाशी थेट संबंध येतो. त्यासाठी पूर्वी सुवर्णजयंती राजस्व अभियान राबविले जायचे. दरम्यान, महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने १ ऑगस्ट २0१५ पासून महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. दरम्यान, १ ऑगस्ट २0१७ पासून अधिक विस्तारित स्वरूपात हे अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ‘महाराजस्व अभियान’च्या माध्यमातून जिल्हा, तालुका, गावाच्या भूसंपत्तीचे अचूक व्यवस्थापन व नियमन करण्यासाठी शिवारफेरीचे आयोजन करणे, गटनिहाय पोट खराब क्षेत्र सर्वेक्षण नोंदी घेणे, पोत सुधारलेल्या गटांच्या जमिनींचे सर्वेक्षण करणे व नोंदी घेणे, सिंचीत क्षेत्राचे सर्वेक्षण, पिके व फळबागांच्या वस्तूनिष्ठ नोंदी घेणे, पाणी पुरवठा साधनांच्या नोंदी घेणे, नदी-नाले-ओढय़ांवर झालेल्या अ ितक्रमणाची माहिती संकलित करणे यांसह इतरही विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश शासनाने महसूल विभागाला दिले आहेत.
महाराजस्व अभियानातील लोकाभिमुख घटक- विविध दाखले शिबिरे घेऊन प्रदान करणे- विस्तारित समाधान योजना राबविणे- महसूल अधिकार्यांकडे सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रलंबित असणारे सर्व अर्धन्यायिक प्रकरणे निकाली काढणे.- एका महिन्यावर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे व त्याकरिता मंडळ मुख्यालयी फेरफार अदालत घेणे- ई-फेरफार सुविधा प्रत्येक गावात उपलब्ध करुन देणे- भूसंपादन केल्याप्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करणे- गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते, पाणंद, शेतरस्ते, शिवार रस्ते, शेतावर जाण्याचे पायमार्ग मोकळे करणे आदी लोकाभिमुख घटकांचा महाराजस्व अभियानात समावेश करण्यात आलेला आहे.
महाराजस्व अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. चालू वर्षाच्या १ ऑगस्टपासून पुढील वर्षाच्या ३१ जुलै २0१८ पर्यंत पुन्हा ही मोहीम राबविली जात असून, या अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांची महसूल विभागाशी संबंधित कामे निकाली काढण्य जिल्हा प्रशासन पुरेपूर प्रयत्न करणार आहे. तशा सूचना कर्मचार्यांना दिल्या आहेत.- शैलेष हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम