लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: समन्वयित कृषी विकास प्रकल्पाचा आढावा विभागीय आयुक्तांनी बुधवारी सायंकाळी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेतला. यावेळी समन्वयित कृषी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून शेतीमधील उत्पादन वाढीबरोबरच इतर शेतीपूरक व्यवसायांची उभारणी करण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त तथा प्रकल्प संचालक पीयूष सिंह यांनी दिल्या.यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, समन्वयित कृषी विकास प्रकल्पाचे जिल्हा सनियंत्रण व मुल्यांकन अधिकारी सर्जेराव ढवळे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे विभागीय समन्वयक राजू इंगळे, जिल्हा समन्वयक राजेश नागपुरे यांच्यासह संबंधित क्लस्टरच्या अंमलबजावणी यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शेतकर्यांना रेशीम शेती, मत्स्यशेतीसारखे शेतीपूरक व्यवसाय सुरू करून अतिरिक्त उत्पन्न घेण्यासाठी शेतकर्यांना समन्वयित कृषी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून प्रोत्साहित करा. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतीमधील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी राबविण्यात येणार्या उपक्रमांची माहिती जास्तीत जास्त शेतकर्यांना होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्तांनी दिल्या. समन्वयीत कृषी विकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील सहा क्लस्टरमध्ये राबविण्यात असलेल्या उपक्रमांचा तसेच नियोजित कामांचा आढावा घेतला. या बैठकीनंतर विभागीय आयुक्तांनी शेलगाव बोंदडे येथील बीज प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. समन्वयित कृषी विकास प्रकल्पांतर्गत शेलगाव बोंदडे (ता. मालेगाव) येथे बीज प्रक्रिया केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त पीयूष सिंह व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या प्रकल्पाची माहिती घेतली. या केंद्रावर सध्या हरभरा बीज प्रक्रिया सुरू असून, याबाबत समन्वयित कृषी विकास प्रकल्पाचे जिल्हा सनियंत्रण व मूल्यांकन अधिकारी सर्जेराव ढवळे, केंद्राचे अध्यक्ष उमेश वाजूळकर यांनी माहिती दिली. परिसरातील ८ गावांमधील ३४0 शेतकर्यांच्या साहाय्याने हरभरा बीजोत्पादन घेण्यात येत असून, वाशिमसह हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यातही या केंद्रातील बीज प्रक्रिया केलेले बियाणे विक्रीसाठी पाठविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषी विकास प्रकल्पाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 1:01 AM
वाशिम: समन्वयित कृषी विकास प्रकल्पाचा आढावा विभागीय आयुक्तांनी बुधवारी सायंकाळी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेतला. यावेळी समन्वयित कृषी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून शेतीमधील उत्पादन वाढीबरोबरच इतर शेतीपूरक व्यवसायांची उभारणी करण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त तथा प्रकल्प संचालक पीयूष सिंह यांनी दिल्या.
ठळक मुद्देव्यवसाय उभारणीसाठी मिळणार प्रोत्साहन बीज प्रक्रिया केंद्राची पाहणी