यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. अनिल कावरखे, डॉ. संदीप हेडाऊ, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. रणजित सरनाईक यांच्यासह रुग्णालयांचे डॉक्टर, प्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, ३ शासकीय आणि ९ खासगी रुग्णालयांचा या योजनेत समावेश आहे. या योजनांची माहिती प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावी. अंगीकृत रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित रुग्णालयानेसुद्धा विशेष प्रयत्न करावेत. रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या रुग्णांना योग्य माहिती देऊन त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी. आवश्यक कागदपत्रांची माहिती संबंधित रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाइकांना द्यावी. तसेच त्यांना योजनेचा लाभ घेण्याविषयी आवश्यक योग्य मार्गदर्शन करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जनआरोग्य योजनेचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:53 AM