०००००
अनिसंग येथे वाहन तपासणी
वाशिम : अनसिंग (ता. वाशिम ) परिसरात गत दोन दिवसांत जिल्हा वाहतूक शाखा व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या पथकाने मार्गावर उभे राहून वाहनांची कसून तपासणी केली. यावेळी अनेकांना आर्थिक दंडदेखील करण्यात आला.
०००
किन्हीराजा येथे वीजपुरवठा सुरळीत
वाशिम : किन्हीराजा येथील शेतकऱ्यांकडे वीज देयकांची थकबाकी वाढतच आहे. यामुळे महावितरणने काही दिवसांपूर्वी कृषिपंपांचा वीज पुरवठा खंडित केला होता. शेतकऱ्यांनी देयक अदा केल्यानंतर तो सुरळीत करण्यात आला.
०००००
हॉटेल व्यावसायिक सापडले अडचणीत
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हाॅटेलमधील पार्सल सुविधेवरही बंधन आले आहे; ग्राहक त्यास तयार नसल्याने बहुतांश हॉटेल व्यावसायिक आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत.
०००००००
मोबदल्यापासून शेतकरी वंचित
वाशिम : पैनगंगा नदीवरील बॅरेजचे पाणी शेतात घुसत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्यानंतरही अद्यापही भरपाई मिळाली नाही. नुकसानग्रस्त जमिनीचा सर्व्हे करून भरपाई देण्याची मागणी जिल्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात गुरूवारी केली.