शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

शेती स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षांनी घेतला विविध योजनांचा आढावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 8:07 PM

वाशिम : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील सर्व गोरगरीब, वंचित कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना तिवारी यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्ह्यातील सर्व गोरगरीब, वंचित कुटुंबांना मिळणार योजनेचा लाभ आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना तिवारी यांनी दिल्या 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील सर्व गोरगरीब, वंचित कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना तिवारी यांनी दिली.यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील कोरडे, उपविभागीय महसूल अधिकारी राजेश पारनाईक, डॉ. शरद जावळे, अभिषेक देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. डी. एल. जाधव, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, जिल्हा पणन अधिकारी ढाकरे, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. जे. एम. जांभरूणकर, तहसीलदार बळवंत अरखराव आदी उपस्थित होते.तिवारी म्हणाले की, जिल्ह्यातील एकही गरीब व्यक्ती अन्नापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. याकरिता अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये जिल्ह्यातील सर्व गरीब, वंचित कुटुंबांचा करण्यात यावा. नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे असून जिल्हा सामान्य रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील आरोग्य सुविधाचा दर्जा कायम राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी यामध्ये समाविष्ट हॉस्पिटलची संख्या वाढविण्याचा प्रयत्न करा व जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ देण्याच्या सूचनाही तिवारी यांनी केली.शेतकºयांचे शेतीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केम, आत्माच्या माध्यमातून शेती पूरक उद्योग उभारणीला चालना देऊन रोजगार निर्मिती करण्याची गरज आहे. याकरिता शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून बिजोत्पादन, शेतीमाल प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना तिवारी यांनी केली. शेतकºयांना शेतमाल तारण योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्साहित करा. शेतमालाला योग्य दर मिळण्यासाठी शेतकºयांना या योजनेचा लाभ होईल, असेही ते म्हणाले. यावेळी तिवारी यांनी कृषी, आरोग्य, महावितरण, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, ग्रामीण विकास यंत्रणा, प्रेरणा प्रकल्प, पीक कर्ज वाटप आदींचा आढावा घेतला.