५३ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रांत सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे. सोयाबीन या पिकाला मागील पंधरा दिवसांपासून पाऊस दडी मारून बसल्याने फुलोऱ्याच्या अवस्थेतील सोयाबीन पीक अनेक ठिकाणी कोमेजले होते.
मानोरा तालुक्यात खरीप हंगामात पेरण्यात आलेल्या एकूण बियाण्यापैकी ३१ हजार हेक्टरच्या जवळपास सोयाबीन या पिकाच्या बियाण्यांची पेरणी शेतकऱ्यांनी केलेली आहे.
मागील पंधरवड्यातील अपवाद वगळता समाधानकारक पाऊस झालेले असल्याने सोयाबीन आणि इतरही पिके आता बहरात आहेत.
निसर्गाने साथ दिल्यास मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी सोयाबीनचे विक्रमी पीक तालुक्यात होण्याची आस शेतकरी लावून बसलेले आहेत. तालुक्यातील डौलाने उभे असलेल्या आणि चांगली वाढ झालेल्या सोयाबीनच्या पिकावर काही प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव झाल्याने किडनाशकांची फवारणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे.