याप्रसंगी जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांनी विविध विषयांवर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच जिल्ह्यातील गावागावात शाखा उघडून रिपाइं आठवलेचे संघटन वाढविणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे पक्ष संघटन मजबूत करून तळागाळातील सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी अहोरात्र झटत आहेत, असे सांगितले. याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष शेषराव मेश्राम, ज्येष्ठ साहित्यिक महेंद्र ताजणे, मालेगाव तालुकाध्यक्ष प्रकाश गवई, युवा महासचिव कवी राठोड, सिने अभिनेते अरविंद उचित यांनी मार्गदर्शन केले. या वेळी रिसोड तालुकाध्यक्ष हिरामण साबळे, जिल्हा उपाध्यक्ष रामदास भगत, मंगरुळपीर तालुकाध्यक्ष तुकाराम खडसे, मानोरा तालुकाध्यक्ष माणिकराव जामनिक, देवचंद खाडे कारंजा, पवन राठोड, खरात, सिद्धार्थ पाटील, कवरदरीचे माजी सरपंच रमेश कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
रिपाइंची तालुका कार्यकारिणी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 4:43 AM