^^^^^^^^^
पुलाचे काम अर्धवट
वाशिम : काजळेश्वर येथून जवळच असलेल्या उकर्डा येथील उमा नदीपात्रावर पुलाचे काम अर्धवटच आहे. त्यामुळे खरीप हंगामातील विविध कामांसाठी शेतकऱ्यांची वहिवाट बंद पडली असून, पेरणीच्या कामात अडथळे येणार असल्याचे दिसत आहे.
-------
कामरगावच्या बाजारपेठेत गर्दी
वाशिम : कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे शनिवारी दिसून आले. कामरगावसह परिसरातील गावांत कोरोना संसर्ग पसरत असतानाही कामरगावातील ग्रामस्थांत कोरोना संसर्गाची भीतीच नसल्याचे त्यामुळे स्पष्ट होत आहे.
----------------
रोहयोच्या कामाची देयके प्रलंबित
वाशिम : २०१९ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर बांधकाम दुरूस्ती केलेल्या ‘कुशल’ची देयके अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळे संबंधित शेतकरी हैराण झाले आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी उधारीवर गज, रेती, गिट्टी आदी साहित्य घेऊन काम केले.
----------
वन्यप्राण्यांची छुप्या पद्धतीने शिकार
वािशम : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात रात्रीच्यावेळी शिकारी वन्यप्राण्यांची शिकार करीत आहेत. वनविभागाने यावर नियंत्रणाचे प्रयत्नही केले; परंतु पेट्रोलिंग बंद झाल्याने पुन्हा वन्यप्राण्यांची शिकार करण्यात येत आहे.