वाशिम : जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोना झपाट्याने पसरत आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात आरोग्य सुविधाच असल्याने रुग्णांना शहरी भागात यावे लागते. दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते २१ एप्रिल या दरम्यान ग्रामीण भागातील जवळपास ४२ जणांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मेडशी ता. मालेगाव या ग्रामीण भागातच आढळला होता. दुसऱ्या लाटेतही ग्रामीण भागात कोरोना झपाट्याने पसरत आहे. रिसोड तालुक्यातील गोवर्धना या एकट्या गावात ६५० च्या वर रुग्ण आढळून आले. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला की त्याला शहरी भागातील कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात येते. आॅक्सिजन किंवा व्हेंटीलेटरची आवश्यकता असेल तर ग्रामीण रुग्णाला जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागते. आतापर्यंत एकूण २४५ जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्या लाटेत ९१ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये ग्रामीण भागातील ४२ जणांचा समावेश आहे.
००
ऑक्सिजनसाठी करावा लागतोय ६० कि. मी. चा प्रवास
ग्रामीण भागात तसेच वाशिम व कारंजाचा अपवाद वगळता उर्वरीत शहरातील दवाखान्यातही आॅक्सिजन बेड नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना आॅक्सिजन बेडसाठी ५० ते ६० किमी अंतर पार करून वाशिमला यावे लागते.
००
कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड नाही
जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात अद्याप कोविड केअर सेंटरच नाही तसेच खासगी कोविड हाॅस्पिटलदेखील नाही. रिसोड, मंगरूळपीर, मानोरा येथे कोविड केअर सेंटर आहे; परंतू येथे आॅक्सिजन बेडची सुविधा नाही. कारंजा उपजिल्हा रुग्णालयात आॅक्सिजन बेड उपलब्ध आहेत. तालुकास्तरीय कोविड केअर सेंटरमध्ये आॅक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध केव्हा होणार? याकडे रुग्णांसह जनतेचे लक्ष लागून आहे.
००
ग्रामीण भागात आरोग्य विभागातर्फे आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर असून, मध्यम व तिव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांना वाशिम येथील जिल्हा कोविड हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात येते.- डाॅ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम
००
तालुकाएकूण रुग्णजास्त रुग्णकोरोनाबाधितकोरोनामुक्त
असलेले गाव वगावेगावे
रुग्णसंख्या
वाशिम ६२७८ काटा/५५ ८१ ४१
मानोरा १२६९ पोहरादेवी/५६ ११० ०८
मंगरुळपीर ३३८० शेलुबाजार/१३० १०८ ०७
रिसोड ५०५४ गोवर्धन/६५० ५६ ५४
कारंजा १७६० कामरगाव/१०२ १३७ ००
मालेगाव २१८२ धमधमी/१०१ ११७ ०२
०००
तालुका ठिकाणी ऑक्सिजन बेड्सची मारामार
तालुकाकोविड हॉस्पीटल साधे बेड्स ऑक्सिजन बेड्स
वाशिम १८ ४०० ४८०
मानोरा१ १०० ०००
मंगरुळपीर१ २०० ०००
रिसोड२ २०० ०८
कारंजा२ २१० ३०
मालेगाव ००० ००० ०००
००