वाशिम : वाशिम जिल्ह्यातील तीन मतदारसंघांपैकी अत्यंत चुरशीच्या असलेल्या रिसोड मतदारसंघात धक्कादायक निकाल अपेक्षीत आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांनी दहाव्या फेरीअखेर आघाडी घेतली आहे. दहाव्या फेरी अखेर देशमुख यांना २५४९१ मते मिळाली असून, काँग्रेसचे विद्यमान आमदार अमित झनक यांना २२६६४ मते मिळाली आहेत. शिवसेनेच्या विश्वनाथ सानप यांना ८९३२ मिळाली असून, वंचित बहूजन आघाडीचे दिलीप जाधव यांनी २०४६६ मते घेतली आहेत.रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे अमित झनक , काँग्रेसचे बंडखोर अपक्ष अनंतराव देशमुख व वंचित बहुजन आघाडीचे दिलीप जाधव यांच्यात चुरशीची लढत झाली. रिसोड विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ५८ हजार ३७८ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत २ लाख ९ हजार ३६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून निवडणुकीत ६६.१३ टक्के मतदान झालंय. २०१४ च्या निवडणुकीत अमित झनक यांनी ७० हजार ९३९ मतं मिळवून भाजपाच्या विजय जाधव यांचा पराभव केला होता.
रिसोड निवडणूक निकाल : अपक्ष अनंतराव देशमुख आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 2:27 PM