लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : गेल्या १५ दिवसांपासून रिसोड शहराला अडोळ येथील प्रकल्पातून पिवळ्या पाण्याचा पुरवठा होत आहे. या पृष्ठभुमीवर लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यावर रिसोडच्या नगराध्यक्ष विजयमाला आसनकर यांनी या प्रकल्पाला भेट देऊन पाण्याची पाहणी केली आणि माहिती घेतली. उन्हाचा पारा वाढल्याने एप्रिल महिन्यात या पाण्याचा रंग पिवळा होतो आणि पुढील आठ ते १५ दिवस पाणी असेच राहणार असल्याचे कळले. रिसोड शहराला मालेगाव तालुक्यातील अडोळ धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. तथापि, गेल्या १५ दिवसांपासून या धरणातून नळाद्वारे सोडण्यात येत असलेले पाणी पिवळ्या रंगाचे असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले. या दुषित पाण्यामुळे आजाराची भिती असल्याने नागरिक कॅनचे पाणी विकत घेऊ लागले. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन नगराध्यक्षांनी शनिवारी या धरणाची पाहणी केली. त्यावेळी एप्रिल महिन्यात उन्हाचा पारा वाढल्यानंतर या धरणातील पाण्याचा रंग पिवळा होत असल्याचे येथे १५ वर्षांपासून काम करणाºया कर्मचाºयाने सांगितले. तथापि, हे पाणी पिण्यास घातक नसून, एप्रिल महिना संपल्यानंतर पुन्हा पाणी निवळणार असल्याने हे पाणी पिण्यास हरकत नाही, असेही त्याने सांगितले. नगर परिषदेने केले सर्व उपायअडोळ प्रकल्पातून रिसोड शहरात नळाद्वारे सोडण्यात येत असलेले पाणी पिवळ्या रंगाचे असल्याने नागरिकांत भिती निर्माण झाली होती. याची दखल नगर परिषद प्रशासनाने घेतली आणि पाणी शुद्ध करण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्पाची साफसफाई केली. त्यात आवश्यक त्या प्रमाणात तुरटीही टाकली. त्यामुळे पाणी निवळून स्वच्छ पाणी पुरवठा होण्याची अपेक्षा होती; परंतु या सर्व उपाय योजनानंतरही नळाद्वारे सोडलेले पाणी पिवळेच असल्याचे आढळून आले. त्यात आता आणखी तुरटी टाकणे अपायकारक आहे. नगराध्यक्षांच्या मते पाणी योग्य वातावरणातील बदलामुळे रिसोड शहराला पाणी पुरवठा करणाºया अडोळ धरणाच्या पाण्याचा रंग पिवळा झाला आहे. तथापि, हे पाणी दुषित नसून, यामुळे आरोग्यास कुठलाही धोका नाही. नागरिकांनी हे पाणी पिण्यास काहीच हरकत नाही, असे मत रिसोडच्या नगराध्यक्ष विजयमाना आसनकर यांनी धरणाची पाहणी करून माहिती घेतल्यानंतर व्यक्त केले.
रिसोडला आणखी १५ दिवस मिळणार पिवळेच पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 4:15 PM