शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

रिसोड नगर परिषद निवडणूक;  १२ नोव्हेंबरपासून नामांकन अर्ज भरण्याला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 1:39 PM

रिसोड (वाशिम) : रिसोड नगर परिषदेच्या निवडणुकीत १२ नोव्हेंबरपासून नामांकन अर्ज भरण्याला सुरूवात होत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : रिसोड नगर परिषदेच्या निवडणुकीत १२ नोव्हेंबरपासून नामांकन अर्ज भरण्याला सुरूवात होत आहे. नगर परिषद सदस्यांचा पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात येत असल्याने ९ डिसेंबर २०१८ रोजी मतदान होणार आहे. थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाची निवडणूक असल्याने, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा, विधानसभा निवडणुकीची रंगीत तालिम म्हणून रिसोड नगर परिषदेच्या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, भारिप-बमसं या प्रमुख पक्षांनी या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत आल्याने आतापासूनच निवडणूक अटितटीची बनल्याचे दिसून येते. कोणत्याही परिस्थितीत नगर परिषदेवर सत्ता मिळविण्यासाठी प्रत्येक पक्षाने प्रतिष्ठा पणाला लावली असली तरी दुसरीकडे काही पक्षात अंतर्गत गटबाजीही उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अंतर्गत गटबाजी टाळून स्वपक्षातील हितचिंतकांबरोबरच विरोधकांवर कशी मात करायची? याची फिल्डिंग लावली जात असल्याचे दिसून येते. शहरातील कॉर्नर बैठकांमुळे थंडीच्या हंगामातही राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रमुख पक्षांनी अद्याप नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहिर केला नसल्याने उत्सूकता अधिकच ताणली जात आहे. ९ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, १० डिसेंबर रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहिर होणार आहे. तत्पूर्वी १२ नोव्हेंबरपासून उमेदवारी (नामांकन) अर्ज स्विकारण्याला सुरूवात होणार आहे. १२ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड