लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : बहुचर्चित, बहुप्रतिक्षित रिसोड नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहिर होत असून, नगरसेवक पदाच्या निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाशिम जिल्हा जनविकास आघाडीचे तब्बल ९ नगरसेवक विजयी झाले आहेत तर भाजपाला खातेही उघडला आले नाही.रिसोड नगर परिषद सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने ही निवडणूक घेण्यात आली. यंदा प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्षांची निवड होणार असल्याने या निवडणुकीला आगळेवेगळे महत्व प्राप्त झाले होते. रविवारी मतदान झाल्यानंतर, सोमवार १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरूवात झाली. एकूण १० प्रभागातून २० नगर सेवक पदासाठी ही निवडणूक झाली. नगरसेवक पदाच्या सर्वच जागांचे निकाल जाहिर झाले असून, यामध्ये माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाशिम जिल्हा जनविकास आघाडीचे तब्बल ९ नगरसेवक विजयी झाले. काँग्रेस तीन, शिवसेना तीन, भारिप-बमसं दोन आणि अपक्ष तीन असे पक्षीय बलाबल आहे.दरम्यान, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत वाशिम जिल्हा जनविकास आघाडीच्या उमेदवार विजयमाला कृष्णाप्पा आसनकर सौ. विजयमाला आसनकर यांनि विजयी आघाडी घेतली आहे. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. दुसºया क्रमांकावर भारिप-बमसंचे शेख नजमाबी ख्वाजा तर तिसºया क्रमांकावर शिवसेना, भाजपा, शिवसंग्राम महाआघाडीच्या ज्योती अरूण मगर राहिल्या आहेत.
रिसोड नगर परिषद निवडणुक; जनविकास आघाडीचे ९ नगरसेवक विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:11 PM
रिसोड (वाशिम) : बहुचर्चित, बहुप्रतिक्षित रिसोड नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहिर होत असून, नगरसेवक पदाच्या निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाशिम जिल्हा जनविकास आघाडीचे तब्बल ९ नगरसेवक विजयी झाले आहेत तर भाजपाला खातेही उघडला आले नाही.
ठळक मुद्देरविवारी मतदान झाल्यानंतर, सोमवार १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरूवात झाली. वाशिम जिल्हा जनविकास आघाडीचे तब्बल ९ नगरसेवक विजयी झाले.काँग्रेस तीन, शिवसेना तीन, भारिप-बमसं दोन आणि अपक्ष तीन असे पक्षीय बलाबल आहे.