अशिया बी. अब्दुल तस्लिम यांच्यासह त्यांचे पती अब्दुल तस्लिम व त्यांचा मुलगा अब्दल रहिम, इमरान खान यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. रविवार २१ रोजी खासदार भावना गवळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी खासदार भावना गवळी यांच्यावर विश्वास ठेवून, तसेच शिवसेना नगरसेवक कपिल कदम व संतोष चऱ्हाटे यांच्या नेतृत्त्वात त्यांचा प्रवेश करण्यात आला. यावेळी भागवतराव गवळी निवासी उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख महादेवराव ठाकरे, शहरप्रमुख अरुण मगर, युवासेना तालुकाप्रमुख गजानन अवताडे, नगरसेवक राजेश मोहळे, सुभाष चोपडे, सागर शिरसागर उपस्थित होते. खासदार भावना गवळी यांनी पक्ष प्रवेश करणाऱ्या शिवसैनिकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व नगरसेवकांना जितका निधी लागेल तितका निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले. शहरातील नागरिकांचे कोणतेही काम थांबणार नाही. यासाठी नगरसेवकांनी जबाबदारीने आपापल्या वार्डातील नागरिकांचे जास्तीत जास्त काम करावे व नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे सांगितले. अधिकाधिक निधी उपलब्ध करून देऊन शहरातील कानाकोपऱ्यातील रस्ते, नाली व जी काही कामे असतील ती त्वरित करावीत, अशा सूचनाही त्यांनी केल्या. (वा.प्र.)
रिसोड नगरपरिषद उपाध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 5:02 AM