रिसोड : ग्रामविकास विभागासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांना मिळवून देण्याची व योजनांची अधिनस्थ कर्मचार्यांकडून योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्यांची असते. त्या दृष्टीने गटविकास अधिकारी म्हणून रुजु होणारा अधिकारी किमान तीन वर्षेपर्यंंत एका पंचायत समितीत राहणे, त्याची तीन वर्षापूर्वी बदली न होणे विकासासाठी आवश्यक ठरते. परंतु रिसोड पंचायत समितीत कोणताही गटविकास अधिकारी टिकून राहत नाही. त्यामुळे या पंचायत समितीचा पदभार मागील २२ वर्षात आठ दहा नव्हे तर तब्बल २२ गटविकास अधिकार्यांनी स्वीकारला आहे. हे विश्ोष.तालुक्यातील ८१ ग्रामपंचायती अंतर्गत होणार्या विकास कामांचा कारभार रिसोड पंचायत समितीमार्फत चालतो. या ८१ ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणार्या ९८ गावामध्ये राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी पंचायत समितीच्या मार्गदर्शनात केली जाते. ग्रामपंचायतीमार्फत ही कामे करुन घेण्याची जबाबदारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सांभाळतात त्यादृष्टीने पंचायत समितीध्ये एकदा रुजु झालेला गटविकास अधिकारी किमान तीन वर्षेपर्यंत तेथे टिकून राहणे गरजेचे आहे .रिसोड पंचायत समिती याला अपवाद असून या पं.स.मध्ये १९९२ ते २0१४ या २२ वर्षाच्या कालावधीत रिसोड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणूून तब्बल २२ गटविकास अधिकार्यांनी पदभार स्वीकारला असल्याची नोंद झाली आहे.अशी स्थिती जिल्हयातील क्वचितच कुठल्या पंचायत समितीमध्ये असेल. रिसोड पं.स.च्या गटविकास अधिकारीपदी एम.बी.घसाळकर रुजु झाले आहेत. ते रिसोड पं.स.चे २२ वे गटविकास अधिकारी आहेत.रिसोड पं.स.ला आतापर्यंंत यू.सी.शेख दोन वेळा, एस.एस.पवार, कमलाबाई देशमुख, हरिभाऊसरोदे, पी.यु.झटाले, व्ही.एन.बन्हे, आर.एल.मयुर, बी.के.राठोड, सी.पी.कापसे, मंगला शिंदे, व्ही.जे.वानखडे, हेमंतकुमार सहारे, अरविंद वंजारी, वसंत बेलेकर, डी.एस.मकासरे, संदिप पवार, एम.आर.नाईक, आर.जे.फडके, दोन वेळा, रंजना काळे, यांनी गटविकासअधिकारी म्हणूनकाम केले आहे.सध्या एम.बी.घसाळकर हे कारभार सांभाळत आहेत.
रिसोड पंचायत समितीला २२ वर्षात, २२ बिडीओ
By admin | Published: June 20, 2014 12:00 AM