रिसोड : तालुक्यातील गोवर्धन येथे शुक्रवार, ९ फेब्रुवारीला तालुक्यातील सरपंचांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रिसोड पंचायत समितीच्या वतीने आयोजित या मेळाव्यात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचांना बोलाविण्यात आले असून विविध विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती गटविकास अधिकाºयांनी गुरूवारी दिली.शुक्रवारी सकाळी ११ वाजता होणाºया सरपंच मेळाव्याचे उद्घाटन खासदार भावना गवळी यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख राहतील; तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमित झनक, जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप, आरोग्य व शिक्षण सभापती सुधीर गोळे, महिला व बालकल्याण सभापती यमुना जाधव, समाजकल्याण सभापती पानुताई जाधव, रिसोड पं.स. सभापती छाया पाटील, तहसिलदार राजेश सुरडकर, शिरपूरचे पोलिस निरीक्षक हरिष गवळी, रिसोडचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, रेणुकामाता संस्थानचे अध्यक्ष भिमराव वाघ, उपाध्यक्ष तेजराव वाघ, बाळासाहेब वाघ, गोवर्धन ग्रा.पं.चे सरपंच नंदा शेळके, पोलिस पाटील रमेश खोटे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नारायणराव वाघ आदिंची उपस्थिती लाभणार आहे.
रिसोड पंचायत समिती: गोवर्धन येथे शुक्रवारी सरपंच मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 4:41 PM
रिसोड : तालुक्यातील गोवर्धन येथे शुक्रवार, ९ फेब्रुवारीला तालुक्यातील सरपंचांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्देसरपंच मेळाव्याचे उद्घाटन खासदार भावना गवळी यांच्या हस्ते होईल. मेळाव्यात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचांना बोलाविण्यात आले आहे. विविध विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती गटविकास अधिकाºयांनी गुरूवारी दिली.