बोराळा जहा. (वाशिम) : येथे असलेल्या अडोळ प्रकल्पामधून रिसोड शहरासह शिरपूर जैन या गावाला पाणी पुरवठा केल्या जाते; मात्र योग्य नियोजनाअभावी दोन गावांना पाणीपुरवठा करणारे गाव तहानलेले आहे. येथे २0 दिवसानंतर पाणी ग्रामस्थांना मिळत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केल्या जात आहे. यासंदर्भात संबंधिताना विचारणा केल्यास ह्यआधी कर भरा नंतर पाणीह्ण असे उत्तर देऊन मोकळे होत आहेत.गावामध्ये अडोळ लघु प्रकल्प आहे. गावातील पाण्याची पातळीसुद्धा चांगली आहे. याच धरणातून रिसोड, शिरपूर जैनसारख्या मोठय़ा शहरांना पाणीपुरवठा केल्या जातो; मात्र बोराळा गावामध्ये पाणी मिळत नाही, या प्रश्नावर कुठलीही व्यवस्था होत नाही. गावातील नळ योजनेची पाईपलाईन बरेच जागी फुटलेली आहे. टाकीमध्ये पाणी येणार्या लाईनवर नळ जोडणी केलेली आहे. त्यामुळे टाकीमध्ये पाणी येत नाही आणि काही नळ मुख्य लाईनवर जोडलेले असल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जाते. यामुळे ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांतून केल्या जात आहे.
रिसोड,शिरपूरला पाणी पुरवठा करणारे गावच तहानलेलं!
By admin | Published: November 06, 2014 1:21 AM