लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - रिसोड तालुक्यातील रिठद येथील सरपंच व उपसरपंच यांच्याविरुद्ध नऊ सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव २४ आॅगस्ट रोजी बहुमताने पारित झाला. रिसोड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या रिठद येथील सरपंच बळीराम बोरकर व उपसरपंच राहूल ताजणे यांच्या विरुद्ध नऊ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी २४ आॅगस्ट रोजी रिठद ग्रामपंचायत येथे सभा बोलाविण्यात आली होती. सभेला एकूण १३ सदस्य उपस्थित होते. यावेळी अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मतदान घेण्यात आले. नऊ सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले तर चार सदस्यांनी या प्रस्तावाविरोधात मतदान केले. १३ सदस्यांपैकी नऊ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने अविश्वास ठराव बहुमताने पारित झाला. दिपाली बोरकर, लिला गवळी, किरण अंभोरे, सिताराम आरु, आत्माराम आरु, नेहा आरु, रजियाबी सै.मुसा, सिंधु फुलउंबरकर, उर्मिला अंभोरे या नऊ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.
रिठदच्या सरपंच-उपसरपंचावरील अविश्वास ठराव पारित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 7:07 PM
वाशिम - रिसोड तालुक्यातील रिठद येथील सरपंच व उपसरपंच यांच्याविरुद्ध नऊ सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव २४ आॅगस्ट रोजी बहुमताने पारित झाला. रिसोड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या रिठद येथील सरपंच बळीराम बोरकर व उपसरपंच राहूल ताजणे यांच्या विरुद्ध नऊ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी २४ आॅगस्ट रोजी रिठद ग्रामपंचायत येथे सभा बोलाविण्यात आली होती. सभेला एकूण १३ सदस्य उपस्थित होते.
ठळक मुद्देताजणे यांच्या विरुद्ध नऊ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होतासभा बोलाविण्यात आली होती; सभेला १३ सदस्य उपस्थित होते