शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

प्रतिकुल परिस्थितीवर केली रियाने मात

By admin | Published: June 06, 2014 12:21 AM

इयत्ता बारावीत घवघवीत यश: रियाने मिळवले कलाशाखेत ९0 टक्के गुण.

शिखरचंद बागरेचा / वाशिमप्रतिकुल परिस्थितीवर मात करुन इयत्ता बारावीमध्ये ९0 टक्के गुण मिळविणार्‍या रिया जाधव हिचे परिङ्म्रम पुर्वक प्रयत्न केल्यास झोपडीतही ज्ञान सुर्य उगवू शक तो. हे सिध्द करुन दाखवून दिले.शाळेतील राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेतील इयत्ता १२ वी कला विभागाची विद्यार्थीनी रिया संजय जाधव हिने सोमवारी लागलेल्या निकाला मध्ये ९0.६४ टक्के गुण मिळवून राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला.रियाने १ ते ४ थी पर्यंतचे प्राथमिक शाळेचे शिक्षण धृव विद्या मंदिर येथे घेतले. पाचवी मध्ये राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत प्रवेश केल्यानंतर तीने इयत्ता दहावीमध्ये ७३ टक्के, गुण मिळविले. तर इयत्ता १२ वी मध्ये ९0 टक्केच्या वर गुण मिळवून सर्वांनाच तीने आश्‍चर्याचा धक्का दिला. १९९७ ला जन्मलेल्या रियाच्या नशिबि वयाच्या एक वर्षा नंतरच हालअपेष्ठा व यातनांची सुरुवात झाली. वडिल संजय जाधव यांनी रियाची आई सविता जाधव यांना घटस्फोट न देता सोडून दिले. पतीने सोडून दिल्यानंतर परित्यक्ता म्हणून वाशिमच्या गवळीपुरा परिसरात आपल्या झोपडीवजा घरामध्ये तीची आई सविता जाधवने काबाडकष्ट क रून मुलीच्या शिक्षणास कमी पडू दिले नाही. त्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी शहरातील एका शोरुम वर तुटपुंज्या पगारावर खासगी नोगरी करण्याची वेळ करून रियाला वडीलांची कमतर ता भासू न देता हिमतीने सांभाळत शिकवून उत्तम यश मिळविण्याची प्रेरणा दिली. वैचारिक विषय कविता व लेख हिलहण्याचा छंद असलेल्या रियाने शालेय जिवनात वक्तृत्व व निबंध स्पर्धांमध्ये अनेकदा पुरस्कार मिळविले आहेत. शिघ्र कवी म्हणून उदयास येत असलेल्या रियाने अनेक कविता लिहल्या आहेत. आयुष्यात कुठल्याही प्रकारची परिस्थिती अनुकुल नसतांना हसतखेळत प्रतिकुल परिस्थितींवर मात करुन व शाळेतून घरी आल्यावर घरच्या कामामध्ये आईला मदत करुन मिळालेल्या वेळेत रिया हिने नियमित पणे अभ्यास केला व हे यशोशिखर गाठले. रिया हिने आपल्या यशाचे श्रेय आई सविता जाधव व शिक्षकवृंदाना दिले आहे. उच्च विद्याविभुषीत होवून मागासलेल्या समाज बांधवांची पत्रकारितेच्या माध्यमातून सेवा करण्याचे स्वप्न आपण बाळगून आहोत असे रिया ने शेवटी लोकमत जवळ व्यक्त केले.