लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: आधीच अरूंद असलेल्या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढल्याने वेळोवेळी वाहतूक कोंडी होत आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणच्या मुख्य रस्त्यांवर दिवसभर हजारो वाहने धावतात. तथापि, वाहनांच्या संख्येच्या तुलनेत वाहतूक सुरळीत होण्यासारखे रस्ते जिल्ह्यात नाहीत. परिणामी तालुकास्तरावरील मोठे चौक किंवा महामार्गावरील ग्रामीण भागातील मुख्य चौकांत सदानकदा वाहतूक कोंडी होत आहे. यात प्रामुख्याने नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील शेलूबाजारचा मुख्य चौक, वाशिम शहरातील पुसद नाका ते बसस्थानक परिसर आणि मालेगाव शहरातील अकोला-वाशिम महामार्गावरील मुख्य चौकाचा उल्लेख करता येईल. या ठिकाणी परस्पर विरोधी दिशेने येणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली की, मार्ग काढण्याच्या प्रयत्नांत अनेक वाहनधारक नियमांचे उल्लंघन करतात. परिणामी वाहतूक कोंडी निर्माण होते. त्याचा फटका अनेकांना बसतोच; परंतु या वाहतुक कोंडीमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वाशिम शहरातील पुसद नाका परिसरात सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.
अरूंद रस्त्यांमुळे वाहतुकीची कोंडी
By admin | Published: July 17, 2017 6:46 PM