कारंजा तालुक्यात समृद्धी महामार्गाचे पी.एन.सी कंपनीकडून काम जोरात सुरू आहे, मात्र कंपनीच्या नियोजन शून्य कारभारामुळे समृद्धीसाठी गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांनी परिसरातील रस्त्याची अवस्था दयनीय केली असून, या रस्त्यावर ग्रामस्थांना चिखलातून ये जा करावा लागतो. या चिखलामुळे कित्येक दुचाकी चालकांचा अपघातही झाला. त्यात कारंजा ते आखतवाडा रस्त्याने हिवरा लाहे, आखतवाडा, नारेगाव, धनज, भामदेवी, पिंप्री मोखड, तारखेडा, लोणी आदी गावची मंडळी ये जा करतात. या गावकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेत कंत्राटदार कंपनीने रस्त्यावर मुरूम टाकून तात्पुरती डागडुजी करणे अपेक्षित असतानाही त्याची तसदी घेतली जात नाही. या रस्त्याच्या दुरवस्थेची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन ग्रामस्थांची समस्या दूर करावी, अशी मागणी सरपंच सागर ढेरे यांनी केली आहे.
समृद्धी महामार्गामुळे रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 4:28 AM