आदिवासीबहुल परिसरात आदिवासी सभागृहापासून ज्ञानदेव तोडासे यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती. या रस्त्याचे नूतनीकरण व्हावे, अशी मागणी तेथील रहिवाशांनी पंचायत समिती सदस्य रंगराव धुर्वे यांच्याकडे केली. दरम्यान, १५ व्या वित्त आयोगांतर्गत धुर्वे यांच्या विकास निधीतून रस्त्याच्या कामास २६ लाखांचा निधी मंजूर झाला असून त्यास प्रशाकीय मान्यताही मिळाली आहे. सिमेंट काँक्रीटचा दर्जेदार रस्ता तयार करण्यात येणार असल्याचे धुर्वे यांनी सांगितले. यावेळी जि.प. सदस्य अशोकराव डोंगरदिवे, माजी सदस्य ज्योती गणेशपूरे, सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष दिगांबर उपाध्ये, नंदकिशोर उपाध्ये, दिलीप गावंडे, जम्मूभाई, जमीरभाई, ज्ञानदेव तोडासे, मंगल मसराम, धर्मदास धुर्वे, रामा कोडापे, लालाजी तोडासे, कबीरदास मसराम, गोलू धुर्वे आदींची उपस्थिती होती.
काजळेश्वर येथील रस्त्यांच्या प्रश्न निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:44 AM