दिव्यांग बांधवांना अन्नधान्याची मदत
वाशिम : हातावर पोट भरणाऱ्यांची उपासमार होत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केकतउमरा येथील चेतन सेवांकुर ऑर्केस्ट्रातील दिव्यांग बालकांना अन्नधान्याचे वाटप केले.
बियाणे उगवण क्षमतेचे प्रात्यक्षिक
पार्डी ताड : खरीप हंगाम तोंडावर आला असून मागील वर्षीप्रमाणे संकटाची स्थिती उद्भवू नये, यासाठी कृषी विभागाकडून गावपातळीवर सोयाबीन बियाणे उगवणक्षमतेचे प्रात्यक्षिक दाखविले जात आहे.
डिझेल भाववाढीने शेतकरी त्रस्त
शिरपूर जैन : मागील काही दिवसांपासून डिझेलच्या दरात सतत होणाऱ्या वाढीमुळे ट्रॅक्टरमालकांसह शेतकरीही त्रस्त झाले आहेत. मागील १२ महिन्यांत डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे.
‘काटेपूर्णा’ला दमदार पावसाची प्रतीक्षा
जउळका : येथील काटेपूर्णा नदीचे पात्र सध्या पूर्णत: कोरडे पडले आहे. यामुळे परिसरातील विशेषत: जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दमदार पावसाची प्रतीक्षा नदी भरण्यासाठी आहे.