वाशिम येथील आगारात आयोजित कार्यक्रमात सहायक पोलीस निरीक्षक इंगळे यांनी चालक, वाहकांसह कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. रस्ते अपघातास आळा बसावा तसेच नागरिकांत वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने सुरक्षितता मोहीम राबविण्यात येत आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी निष्काळजीपणा दूर करून प्रवाशांसह सर्वांनीच सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. रस्ता सुरक्षा, जीवन रक्षा उपक्रमांतर्गत वाहनचालकांना मोटार वाहन कायद्याची माहिती देणे, वाहनचालकांसाठी वाहतूक प्रबोधनपर कार्यशाळा आयोजित करणे, महामार्गावर धावणारी वाहने तसेच बैलगाड्यांना रिफ्लेक्टर लावणे, वाहतूक सिग्नलची देखभाल दुरुस्ती करणे, अवैध प्रवासी वाहतूक, अवजड वाहतुकीवर कारवाई करणे, लायसन्सबाबत जनजागृती करणे, रस्ते सुरक्षाबाबत शालेय विद्यार्थ्यांना माहिती देणे, रस्ता सुरक्षेबाबत निबंध, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करणे, घोषवाक्य स्पर्धा आयोजित करणे आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. कार्यक्रमाला शहर वाहतूक शाखेचे नागेश मोहोड, अभियंता न.दे. चव्हाण, आगार व्यवस्थापक ईलामे, कार्यशाळा अधीक्षक राठोड यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
===Photopath===
210121\21wsm_6_21012021_35.jpg
===Caption===
मार्गदर्शन करताना सहायक पोलीस निरिक्षक इंगळे