लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: येथून पुसदकडे जाणाºया मार्गावरील रेल्वे पटरीवर उड्डाणपूल उभारला जाणार आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, ते अगदीच धिम्यागतीने होत असल्याने नागरिकांसह वाहनधारकांची त्रेधातिरपिट उडत आहे. रेल्वे ये-जा करतेवेळी गेट बंद होत असल्याने दोन्हीकडील वाहने तासन्तास खोळंबतात. त्यामुळे उड्डाणपूल उभारला जावा, ही वाशिमकरांची जुनीच मागणी असून या कामाला आता प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात दोन्हीकडच्या रस्त्याचे रुंदीकरण केले जात असून त्यावर १६ ते १७ कोटी रुपये खर्च होणार आहेत. हे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक असताना त्याची गती धिमी असल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे.
रस्ता रुंदीकरणाचे काम धिम्यागतीने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 6:56 PM
वाशिम: येथून पुसदकडे जाणाºया मार्गावरील रेल्वे पटरीवर उड्डाणपूल उभारला जाणार आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, ते अगदीच धिम्यागतीने होत असल्याने नागरिकांसह वाहनधारकांची त्रेधातिरपिट उडत आहे.
ठळक मुद्देपुसदकडे जाणाºया मार्गावरील रेल्वे पटरीवर उड्डाणपूल उभारला जाणार आहेगेल्या काही दिवसांपासून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरूकाम धिम्यागतीने होत असल्याने नागरिकांची त्रेधातिरपिट