शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

रस्त्याचे काम बंद; गावकरी धडकले तहसिल कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 5:54 PM

मानोरा : तालुक्यातील सावरगाव फॉरेस्ट येथील रस्ता वनविभागाच्या संबंधित अधिकाºयांनी अडविला असून, याविरोधात गावकºयांनी बुधवार, ३१ जुलै रोजी मानोरा तहसिल कार्यालय गाठून रस्ता काम सुरू करण्याची मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : तालुक्यातील सावरगाव फॉरेस्ट येथील रस्ता वनविभागाच्या संबंधित अधिकाºयांनी अडविला असून, याविरोधात गावकºयांनी बुधवार, ३१ जुलै रोजी मानोरा तहसिल कार्यालय गाठून रस्ता काम सुरू करण्याची मागणी केली.मानोरा तालुक्यातील सावरगाव फॉरेस्टचे नागरीक रस्त्यासाठी त्रस्त आहे. सावरगावला ये-जा करण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्याला तोंड द्यावे लागत आहे. सावरगावला रस्ता व्हावा यासाठी नागरिकांनी अनेक आंदोलने केली. सन २०१४ -१५ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहीष्कारही घातला होता. शिवाय ३१ जानेवारी २०१८ रोजी कारंजा-मानोरा या मार्गावर रास्ता रोको आंदोलनही केले होते. सावरगाव येथील नागरिकांच्या निवेदनानुसार, भारत सरकार, पर्यावरण वनविभाग आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय नागपुर यांचे २६ मार्च १८ रोजीच्या पत्रानुसार वन जमिनीला मंजुरी मिळाली. तसेच सदर प्रकरणात मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र राज्य नागपुर यांचे पत्र ९ एपिल २०१८ नुसार मंजुरी सुध्दा मिळाली आहे. त्यानुसार मार्च २०१९ मध्ये रस्ता कामासाठी निविदादेखील काढण्यात आली. संबंधित यंत्रणेकडून कामही सुरू झाले. परंतू, त्यानंतर वनविभागाच्या अधिकाºयांनी रस्ता काम करण्यास मनाई केल्याने रस्त्याचे काम बंद पडले आहे. दुसरा कोणताच रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांसह गावकºयांची प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे. रस्ता काम सुरू करण्याच्या मागणीसाठी बुधवारी गावकºयांनी मानोरा तहसिल कार्यालयात धडक देत तहसिलदारांना निवेदन दिले. निवेदनावर ओंकार धनसिंग राठोड, अरविंद हिरासिंग नाईक, शंकर धनु जाधव, ओंकार पांडूरंग राऊत, सुखदेव किसन राठोड, भाऊराव वासुदेव राठोड , गणेश शेषराव पवार, यांच्यासह नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा