शेलू खडसे येथील शेतकऱ्यांना पाणंद रस्त्याअभावी चिखल तुडवतच शेतात ये-जा करावी लागत होती. ही गैरसोय दूर व्हावी, अशी मागणी गावकऱ्यांनी वेळोवेळी केली. मात्र, त्याची कोणीच दखल घेतली नाही. दरम्यान, नागरिकांनी रस्त्यासाठी आमदार अमित झनक यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनीही तत्परता दाखवून प्रत्यक्ष मोटारसायकलवर जाऊन रस्त्याची पाहणी केली. पाणंद रस्त्याचे महत्त्व लक्षात घेऊन झनक यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून तत्काळ दहा लाखांचा निधी मंजूर करून दिला. त्यातून रस्त्याचे काम मार्गी लागले आहे. १७ जूनला आमदार झनक यांनी रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत बबनराव गारडे, सतीश गाडे, पंजाबराव खडसे, दिलीप खडसे, विजय खडसे, सुधाकर खडसे, ओम खडसे, गजानन खडसे, विठ्ठल पारडे, नारायण खडसे, जगदीश खडसे, शुभम खडसे, संदीप खडसे, गोविंद खडसे, भूषण बोडखे उपस्थित होते.
शेलू खडसे ते भर जहागीर पाणंद रस्त्याचे काम मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 4:27 AM