तोट्यांअभावी नळाचे पाणी जातेय वाया
वाशिम : येथील नागरिकांकडे नळ आहेत, परंतु काही नागरिकांच्या नळाला तोट्या नाहीत. त्यामुळे ओव्हर फ्लो झाल्यानंतर, तसेच पाणी भरून झाल्यानंतर उर्वरित पाणी वाया जाते.
बीएसएनएलमधील रिक्त पदे तत्काळ भरा
वाशिम : जिल्ह्यातील अनेक दूरभाष केंद्रांतील प्रमुख अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अनेक तांत्रिक अडचणी आहेत. यामुळे त्या सोडविण्यासाठी रिक्त पदे भरावीत, अशी मागणी केली जात आहे.
मोप आरोग्य केंद्राला मिळाले स्ट्रेचर
रिसोड : केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या निधीतून तालुक्यातील मोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला स्ट्रेचर वाटप करण्यात आले. याबाबत सामाजिक कार्यकर्ते अमोल नरवाडे यांनी मागणी केली होती. यामुळे रुग्णांची साेय झाली.
सेंद्रीय शेतीचे प्रमाण वाढले
वाशिम : मालेगाव तालुक्यातील मेडशी परिसरात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत सेंद्रीय शेतीचे प्रमाण वाढले आहे. सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाला विक्रीसाठी कृषी विभागाने व्यवस्था निर्माण करणे आवश्यक ठरत आहे.
मान्सूनपूर्व कामे करण्याची मागणी
भर : एका महिन्यावर पावसाळा येऊन ठेपला असून, अद्याप महावितरणने मान्सूनपूर्व कामांना सुरुवात केली नाही. भर जहाँगीर परिसरात महावितरणने मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे.
शेतशिवारात रानडुकरांचा धुमाकूळ
वाशिम : तालुक्यातील अनेक शेतशिवारांत रानडुकरांनी हैदोस घातला आहे. रात्रीच्या सुमारास रानटी डुकरे शेतात शिरून भाजीपाल्याचे नुकसान करतात. वनविभागाने लक्ष देण्याची मागणी आहे.