शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
3
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
4
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
5
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
6
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
7
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
8
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
9
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
10
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
11
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
12
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
13
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
14
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
15
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
16
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
17
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या
18
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
20
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

शेत जमीन पिकांसह रस्ता वाहून गेला, पूलही खचला; इंझोरीत परतीच्या पावसाचे तांडव

By दादाराव गायकवाड | Published: October 06, 2022 10:53 AM

हजारो हेक्टरमधील पिके नेस्तनाबूत

वाशिम (दादाराव गायकवाड): खरीप हंगामातील पिके काढणीवर असतानाच पुन्हा एकदा परतीच्या पावसाने तांडव सुरू केले आहे. बुधवारी रात्री ९. ०० वाजतापासून सुरू झालेल्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेती पिकांसह रस्ता आणि पुलही खचला. या पावसामुळे हजारो हेक्टर मधील पिके नसताना शेतकरी पुन्हा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

इंझोरी परिसरात बुधवारी सायंकाळी सात वाजता नंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. नऊ वाजता पासून अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात रात्रभर पाऊस धो-धो कोसळत राहिला. त्यामुळे कारंजा मानोरा मार्गावरील बहुतांश भागाच्या कडा खचल्याने रस्ता संकटमय झाला. याच मार्गावरील पुलही खचला, शिवाय हजारो हेक्टरमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने जमिनीसह पिके खरडून गेली. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. धो-धो पावसामुळे पिके खरडल्याने आता शेतकऱ्यांना उत्पन्नाची कुठलीही आशा राहिली नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पीक नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाकडे मागणी करावी, अशी याचना इंझोरी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. शेकडो शेतकऱ्यांचे मोटारपंपही गेले वाहूनइंझोरी परिसरात बुधवारी रात्रीपासून गुरुवार सकाळपर्यंत कोसळलेल्या धो-धो पावसामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झाले. शेतात पूर सदृश स्थिती निर्माण झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील मोटार पंपही त्यात वाहून गेले आहेत. जनरेटरवर उघडावे लागले अडाण धरणाचे दरवाजेइंझोरीरी परिसरात बुधवारी रात्री धो धो पाऊस सुरू झाल्याने अडाण धरणात १०० टक्क्यांच्यावर जलसाठा तयार झाला. यामुळे त्यांना धरणाला धोका असताना धरणाचे दरवाजे उघडण्याची तातडीने गरज निर्माण झाली‌ तथापि, वीज पुरवठा खंडित झाल्याने पाटबंधारे विभागासमोर मोठी अडचण निर्माण झाली. अशात पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी समय सूचकता राखून रात्रीच जनरेटर उपलब्ध करीत धरणाचे दरवाजे उघडले. सद्यस्थितीत या धरणाचे पाचही दरवाजे उघडले असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊस