लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर (वाशिम): आगामी दूर्गा विसर्जन सोहळ्याच्या पृष्ठभूमीवर कायदा-सुव्यवस्थेची दखल म्हणून मंगरुळपीर येथे पोलीस दलाच्यावतीने पथसंचलन करण्यात आले. यावेळी दूर्गोत्सव मंडळे व जनतेने जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या नियमांचे पालन करून दूर्गा विसर्जन शांततेत पार पाडावे, असे आवाहन ठाणेदार रमेश जायभाये यांनी केले. मंगरुळपीर येथे दूर्गा विसर्जन सोहळ्याच्या पृष्ठभूमीवर करण्यात आलेल्या पथसंचलनात उपविभागीय पोलीस अधिकारी नंदा पराजे, ठाणेदार रमेश जायभाये, बाहेरच्या ठिकाणचे २ पोलीस निरीक्षक, मंगरुळपीरचे २ उपनिरीक्षक, बाहेरचे २ उपनिरीक्षक, स्थानिक पोलीस कर्मचारी २५, विभागातील १३ पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाची १ तुकडी, आरसीपीचे २२ जवान, जिल्हा वाहतूक शाखेचे १० कर्मचारी, गृहरक्षक दलाचे २५ जवान सहभागी झाले होेते. पथसंचलनानंतर ठाणेदार यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये दूर्गा विसर्जन सोहळ्यात डीजे, डॉल्बी आदि ध्वनी प्रदुषण वाढविणारे वाद्ये वाजविण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन करणाºया मंडळाच्या कार्यकर्त्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
मंगरुळपीर येथे पोलिसांचे पथसंचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 2:41 PM