शासनाने यंदा तुरीला ६००० रुपये प्रति क्विंटलचे हमीदर घोषित केले आहेत. तथापि, शासकीय खरेदी प्रक्रियेतील तूर संपली असतानाच विदेशातील तुरीची आयातही थांबली आहे. त्यामुळे देशांतर्गत तुरीच्या मागणीत वाढ झाल्याने बाजारात तुरीची हमीदरापेक्षा खूप अधिक दराने खरेदी होत आहे. वाशिम जिल्ह्यातील बाजारातही तुरीच्या दरात मोठी तेजी आली. गत आठवड्यात या शेतमालाचे दर प्रति क्विंटल ७३०० रुपयांपेक्षा अधिक झाले होते. तथापि, गत दोन दिवसांतच या शेतमालाच्या दरात घसरण सुरू झाली असून, आता जिल्ह्यातील बाजारात सरासरी ६९०० रुपये प्रति क्विंटल दराने तुरीची खरेदी होत आहे. दरात घसरण होत असल्याने शेतकरी संभ्रमात पडले असून, बाजारात या शेतमालाची आवकही घटल्याचे दिसत आहे.
---------------
आणखी घसरणीची शक्यता
बाजारात हमीदरापेक्षा अधिक दराने तुरीची खरेदी होत असली तरी, गेल्या दोन दिवसांत तुरीच्या दरात ३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण झाली आहे. पुढेही काही काळ ही घसरण होण्याची शक्यता बाजार व्यवस्थेकडून वर्तविली जात आहे. तथापि, ही घसरण सहा हजारांच्या खाली जाण्याची मुळीच शक्यता नसल्याची शक्यताही व्यापारीवर्गाकडून वर्तविली जात आहे.
---------
घसरणीमुळे आवकीवर परिणाम
तुरीच्या दरात गेल्या दोनच दिवसांत ३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण झाल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपर्यंत तुरीचे दर ७३०० रुपये प्रति क्विंटलच्या वर गेल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्यामुळे काहींनी तुरीची खरेदीही थांबविली होती. आता दरात घसरण झाल्याने तुरीची आवक अधिकच घटल्याचे दिसत आहे.
बाजार समित्यांतील तुरीचे दर
बाजार समिती प्रति क्विंटल दर
वाशिम ७०००
कारंजा ७०००
रिसोड ६९३०
मं.पीर ६८५०
मानोरा ६८५०
===Photopath===
110221\11wsm_1_11022021_35.jpg
===Caption===
तुरीच्या दरात ३०० रुपयांची घसरण