वाशिम - वाशिम जिल्हयात यावर्षी झालेल्या अत्यल्प पर्जन्यमान झाले आहे, त्यामुळे शहरवासीयांना पाणीटंचाई होवू नये म्हणून, आमदार राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री यांना ०६ आॅक्टोबर २०१७ रोजी लेखी पत्राव्दारे मौजे कोकलगाव बॅरेज मधून एकबुर्जी धरणात पाणी उपलब्ध करण्याकरिता निधी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. सदर बाब गंभीर स्वरुपाने घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक १९ डिसेंबर २०१७ रोजी तातडीच्या पाणीपुरवठा योजनेस ६ कोटी ८५ लक्ष रुपयांच्या प्रस्तावास मंजुर दिली आहे. जिल्हयात यावर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे जिल्हयातील बहुतांश सिंचन प्रकल्प कोरडे पडले आहे. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणारे एकबुर्जी धरणाची क्षमता ११.९७ द.ल.घ.मी. आहे, परंतु अपुºया पर्जणमानामुळे यावर्षी सदर धरणात १.९० द.ल.घ.मी. एवढाचा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. वाशिम शहरातील पाणीटंचाई निवारणार्थ मौजे कोकलगाव येथील पैनगंगा नदीवरील बॅरेज मधून पिण्याकरिता पाणी घेणे आवश्यक आहे. सदर नदीवरील बॅरेजवरुन तातडीची पाणीपुरवठा योजना तयार केल्यास भविष्यात वाशिम शहराला निर्माण होणारी पाणीटंचाई निर्माण होणार नाही, मौजे कोकलगाव ता.जि.वाशिम येथील पैनगंगा नदीवरील बॅरेज वरुन एकबुर्जी धरणापर्यंत पाणी उचल करण्याकरिता आवश्यक लागणारी पाईप लाईन, पंपींग मशीन, इतर अनुषंगीक कामे करुन घेण्याकरिता आमदार राजेंद्र पाटणी यांनी ७ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यावर दिनांक १९ डिसेंबर २०१७ रोजी सदर प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. व सदर योजना ३१ मार्च २०१८ पर्यंत पुर्ण करणे बंधनकारक आहे, त्यामुळे शहरवासीयांना येत्या काळात पाणीटंचाईतून मुक्तता होणार आहे. सदर योजनेकरिता तात्काळ निधी उपलब्ध करुन दिल्याबददल आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार व्यक्त केले.
वाशिम शहराच्या आकस्मीक पाणीपुरवठा योजनेसाठी ६ कोटी ८५ लक्ष रुपये मंजुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 2:25 PM
वाशिम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक १९ डिसेंबर २०१७ रोजी तातडीच्या पाणीपुरवठा योजनेस ६ कोटी ८५ लक्ष रुपयांच्या प्रस्तावास मंजुर दिली आहे.
ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक १९ डिसेंबर २०१७ रोजी तातडीच्या पाणीपुरवठा योजनेस ६ कोटी ८५ लक्ष रुपयांच्या प्रस्तावास मंजुर दिली आहे.पाईप लाईन, पंपींग मशीन, इतर अनुषंगीक कामे करुन घेण्याकरिता आमदार राजेंद्र पाटणी यांनी ७ कोटी रुपयांची मागणी केली होती. शहरवासीयांना येत्या काळात पाणीटंचाईतून मुक्तता होणार आहे.