शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

वाशिम जिल्ह्याला ५७.५३ कोटी रूपये निधी

By admin | Published: January 11, 2015 12:30 AM

दुष्काळाची पीक नुकसान भरपाई; वाशिम सर्वाधिक ११ तर मानोरा तालुक्याला सर्वात कमी ८ कोटींचा निधी.

वाशिम : २0१४च्या खरीप हंगामामध्ये अपुर्‍या पावसामुळे जिल्हय़ातील सर्व प्रकारच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. अवर्षणामुळे बाधितांना मदत देण्यासाठी वाशिम जिल्हय़ाकरिता ५७ कोटी ५३ लक्ष रुपये इतका निधी प्राप्त झाला असून, याचे लवकरच वाटप करण्यात येणार आहे. खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.आयुक्तांनी दिलेल्या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेल्या निधीमुळे वाशिम तालुक्यात सर्वाधिक ११ कोटी रूपये तर सर्वात कमी ८ कोटीचा निधी मानोरा तालुक्याला मिळाला आहे, तसेच मालेगाव तालुक्याला ९ कोटी ५0 लाख, रिसोड तालुक्याला १0 कोटी ५0 लाख, मंगरूळपीर तालुक्याला ८ कोटी ५३ लाख तर कारंजा तालुक्याला १0 कोटी रूपये निधी मिळाला आहे. निधी मागणीच्या ४0 टक्के असून, तो खर्च झाल्यानंतर उर्वरित निधी वितरित केल्या जाणार आहे. याबाबतच्या यादया लावण्यात आल्या आहेत. या यादयांबाबत आक्षेप नोंदवण्याची शेवटची तारीख २0 जानेवारी आहे. सर्व यादया तलाठी कार्यालय तसेच ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आल्या आहेत. त्यापाहून काही त्रुट्या असल्यास १३ तारखेपर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन महसूल विभागामार्फत करण्यात येत आहे.जिल्हय़ातील सहाही तालुक्यातील शेतकर्‍यांना याचा लाभ मिळणार असून, कारंजा तालुक्यातील अल्प, अत्यल्प भूधारक बाधित शेतकर्‍यांची संख्या २९,८५८ आहे. यामध्ये कारंजा परिसरातील ३0९१, कामरगाव ३५९0, धनज बु. ३६६0, खेर्डा ३५६३, पोहा , उंबर्डा व येवता ४१00 तर हिवरा लाहे ३४५९ आहे. २0१४ च्या खरीप हंगामात दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शासनाकडून शेतकर्‍यांना देण्यात आलेली आर्थिक मदतीच्या रकमेचा निधी जिल्हय़ातील प्रत्येक तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. याचे वाटप लवकरात लवकर करण्यात येत असून, त्या अनुषंगाने यादया तयार करून आवश्यक ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. शेतकर्‍यांना मिळणारी नुकसान भरपाई तोकडी असल्याचे काही शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.