लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राईट टू एज्युकेशनच्या (आरटीई) २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी पुणे येथे झालेल्या लॉटरीच्या सोडतीत वाशिम जिल्हयातून ५४३ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. निवड झालेल्या बालकांच्या पालकांना एसएमएसद्वारे संदेश पाठविण्यात येत आहेत. मोफत प्रवेशासाठी जिल्ह्यातील ९३ खासगी शाळांची नोंदणी झालेली आहे. एकूण ९६५ जागांसाठी अंतिम मुदतीपर्यंत १८७० प्रवेश अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जांमधून पहिली लॉटरी ८ एप्रिल रोजी पुणे येथे काढण्यात आली. यंदा पहिल्यांदा पुणे येथून लॉटरीची सोडत काढण्यात आली. पहिल्या लॉटरी पद्धतीत ‘घर ते शाळा’ या दरम्यानचे अंतर एक किमीपर्यंत असणाºया ५४३ बालकांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली. निवडपात्र बालकांची यादी पुणे येथून प्राप्त झालेली आहे. या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्यानंतर उर्वरीत जागेसाठी दुसरी सोडत काढण्यात येणार आहे.
आरटीई : वाशिम जिल्हयातून ५४३ बालकांची प्रवेशासाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 2:22 PM