लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ८ एप्रिल रोजी पहिली राज्यस्तरीय लॉटरी काढण्यात आली. प्रवेशपात्र बालकांची यादी ९ एप्रिलपर्यंत जिल्हास्तरावर प्राप्त झाली नसून, १० एप्रिलपासून ‘लॉटरी’ लागलेल्या पालकांना एसएमएस पाठविले जाणार आहेत.समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतर्गत येणाºया बालकांसाठी मोफत शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. २५ टक्के मोफत प्रवेशामध्ये सर्व माध्यमाच्या, सर्व बोर्डाच्या (राज्यमंडळ, सीबीएसई, आयसीएसई व आयबीसह) विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक सर्व शाळा जेथे वर्ग पहिली किंवा पूर्व प्राथमिक स्तरावरील आहेत, अशा प्रकारच्या शाळा या प्रवेशासाठी जिल्ह्यातील एकूण ९३ खासगी शाळांची नोंदणी झालेली आहे. एकूण ९६५ जागांसाठी अंतिम मुदतीपर्यंत १८७० प्रवेश अर्ज प्राप्त झाले आहेत. प्राप्त अर्जांमधून पहिली लॉटरी ८ एप्रिल रोजी काढण्यात आली. पहिल्या लॉटरी पद्धतीत ‘घर ते शाळा’ या दरम्यानचे अंतर एक किमीपर्यंत असणाºया बालकांची पहिल्या वर्गातील प्रवेशासाठी निवड करण्यात आली. पहिल्या यादीतील कोणत्या बालकांची ‘लॉटरी’ लागली, यासंदर्भातील यादी वरिष्ठ स्तरावरून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला ९ एप्रिलपर्यंत प्राप्त झाली नाही. १० एप्रिलपर्यंत यादी प्राप्त होईल, असे शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी सांगितले. दरम्यान, लॉटरी लागलेल्या पालकांना १० एप्रिल २०१९ पासून एसएमएस पाठविले जाणार आहेत. एसएमएस न आल्यास शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन ‘अॅप्लिकेशन वाईज डिटेल्स’मध्ये १९ पासून सुरु होणारा अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली आहे का ते पाहावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले.
आरटीई : सोडत जाहीर;प्रवेशप्राप्त बालकांची यादी मात्र मिळालीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 2:36 PM