वाशिम: माहितीचे अदान-प्रदान वेगवान होण्याच्या दृष्टिकोनातून अमलात आलेला ह्यसोशल मीडियाह्ण सध्या अफवा पसरविण्यात मोठय़ा प्रमाणात वापरात येत असल्याचे दिसून येते. गत काही दिवसांमध्ये कारंजात दंगल झाल्याची तर वाशिम येथे बसस्थानकावर बॉम्ब सापडल्याच्या अफवांचे सोशल मीडियावर पेव फुटले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होत असून, सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे. एकमेकांशी संवाद साधण्यापेक्षा सोशल मीडियावर अफवांच्या शेअरिंगलाच कमालीचा ऊत आला आहे. गत दीड वर्षापूर्वी सोशल मीडियावर फेसबुकची असलेली ह्यक्रेझह्ण व्हॉट्स अँपने कमी केली आहे. संवादाच्या या नव्या तंत्राचा अनेकांना मोठा फायदा होत असला तरी, सध्या वाट चुकललेल्या काही वापरकर्त्यांनी या जादूच्या कांडीचा वापर चुकीच्या कामांसाठी चालविला आहे. योग्य प्रसंगावधान साधून एखादी अफवा व्हॉट्स अँपवर शेअर केली जाते. अल्पावधीतच या अफवांचा वायुवेगाने पसार होता आणि नंतर सुरू होते ती सामान्यांची त्रेधातिरपीट. सिनेअभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्या निधनाची अथवा, बॉम्ब सापडल्याची वार्ता असो अफवांनी सर्वसामान्यांना चक्रावून सोडले आहे. कारंजा येथील दंगलीची अफवाही अशीच पेरली होती.
सोशल मीडियावर अफवांचा बाजार
By admin | Published: November 02, 2015 2:59 AM