लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : मानोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली. रस्त्यांची पूर्णपणे चाळणी झाल्याने वाहन चालकांना रस्त्यावरील खड्डे वाचवुन रस्त्याचे मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे.ग्रामीण भागातुन तालुक्याला जोडणारे रस्त्याची संपूर्ण बिकट परिस्थिती झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. नागरिकांना रस्त्यावरुन चालतांना खड्डयांचा अंदाज येत नसल्याने वाहनांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. तालुक्यातील विठोली वरुन कारखेडा रस्ता संपूर्ण खड्डयात गेला आहे. प्रमुख रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक किरकोळ अपघात सुध्दा घडले. रस्त्याची डागडुजी होत नसल्याने नागरिकांना नाहकच त्रास सोसावा लागत आहे. या मार्गावर रामतिर्थ , कारखेडा , वरोली , सेवदासनगर येथील वाहने चालतात. प्रशासन रस्ता दुरुस्तीसाठी पुढाकार घेत नसल्याने आटो चालकांना स्वखर्चाने माती टाकुन खड्डे बुजविले होते, मात्र पावसामुळे माती वाहुन गेल्यामुळे खड्डे कायम राहिले . हीच पििरस्थती विठोली गव्हा, गलमगाव, चिखली, धानोरा गादेगाव या रस्त्याची झाली असल्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी वाहनधारकांकडून केल्या जात आहे. वाशिम - मालेगाव रस्त्यावरही पडले खड्डेवाशिम ते मालेगाव रस्त्यावरही मोठयाप्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर पडलेल्या खड्डयांची दुरुस्ती काही महिन्याआधीच केली होती, परंतु पावसाने दुरुस्ती करण्यात आलेल्या खड्डयांमधील गिट्टी निघून गेल्याने मोठे खड्डे निर्माण झाले आहे.या खड्डयांतून वाहन गेल्यानंतर वाहनाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.
मानोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची चाळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:58 PM
मानोरा : मानोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली. रस्त्यांची पूर्णपणे चाळणी झाल्याने वाहन चालकांना रस्त्यावरील खड्डे वाचवुन रस्त्याचे मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे.
ठळक मुद्देग्रामीण भागातुन तालुक्याला जोडणारे रस्त्याची संपूर्ण बिकट परिस्थिती झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या खड्डयांतून वाहन गेल्यानंतर वाहनाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.