लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात नाफेड केंद्रांवर सोयाबीनची खरेदी सुरू झाली असून, काही ठिकाणी शेतक-यांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मंगरुळपीर येथे सोयाबीन खरेदीला वेग आला असून, गत दोन दिवसांत मात्र या ठिकाणी के वळ २७१ क्विंटल सोयाबीनची खरेदी होऊ शकली आहे.जिल्ह्यात यंदा नाफेडच्या धान्य खरेदीला थोडा विलंब लागल्याने शेतकरी वर्गात रोषाचे वातावरण होते. लोकप्रतिनिधी आणि शेतक-यांनी वारंवार मागणी केल्यानंतर अखेर जिल्ह्यात सर्वप्रथम मंगरुळपीर येथे नाफेडचे खरेदी कें द्र सुरू करण्यात आले. तथापि, सुरुवातीला येथे के वळ उडिद आणि मुगाचीच खरेदी सुरू झाली होती. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांकडून सोयाबीन खरेदीला सुरुवात करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर गत आठवड्यात या ठिकाणी सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला; परंतु सोयाबीनमध्ये ओलावा असल्याचे कारण समोर करून ही खरेदी थांब्विण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी प्रत्यक्ष सोयाबीन खरेदीला सुरुवात करण्यात आली. आता या ठिकाणी सोयाबीन उत्पादक शेतक-यांची गर्दी होत असून, गत दोन दिवसांत २५ शेतक-यांचे मिळून एकूण २७१ क्विंटल सोयाबीन या ठिकाणी हमीभावाने खरेदी करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात वाशिम, मालेगाव, रिसोड, मानोरा आणि कारंजा येथेही सोयाबीन खरेदीला प्रारंभ झाला असून, या ठिकाणी नोंदणी केलेल्या शेतक-यांना सोयाबीन विक्रीसाठी बोलावले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात नाफेडच्या सोयाबीन खरेदीला वेग आल्याचे दिसत आहे.
वाशिम जिल्ह्याती नाफेड केंद्रावर सोयाबीन उत्पादकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 7:40 PM
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात नाफेड केंद्रांवर सोयाबीनची खरेदी सुरू झाली असून, काही ठिकाणी शेतक-यांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मंगरुळपीर येथे सोयाबीन खरेदीला वेग आला असून, गत दोन दिवसांत मात्र या ठिकाणी के वळ २७१ क्विंटल सोयाबीनची खरेदी होऊ शकली आहे.
ठळक मुद्देआवक वाढलीमंगरुळपीर येथे खरेदीला वेग