लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त निघालेल्या श्रींच्या पालखीने रिसोड नगरी दुमदुमून गेली होती.स्थानिक गजनान महाराज मंदिरात ७ फेब्रुवारी रोजी गजाजन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी गजानन महाराज मंदिरात मोठय़ा प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती. गजानन महाराज मंदिर संस्थांच्यावतीने महाराजांच्या पालखीचे आयोजन केले होते. ही पालखी संस्थान वरुन निघाली असता, वारकरी स्वयंस्फुर्तीने या पालखीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. ही पालखी संत गजानन महाराज मंदिरावरून पुढे सिव्हिल लाईन मार्गे मार्गक्रमण करीत होती. ठिकठिकाणी भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. पालखीमध्ये लहान मुले तसेच महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली. महिलांनी रस्त्यावर सडा, रांगोळी काढून महाराजांच्या पालखीचे मोठया भक्तीभावाने स्वागत केले. ही पालखी गुजरी चौक मार्गे सराफ लाईन, पंचवाटकर गल्ली, अष्टभुजा देवी चौक, आसन गल्ली या मार्गे नेण्यात आली. संस्थांच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
संत गजानन महाराजांच्या पालखीने दुमदुमली रिसोडनगरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 1:30 AM
रिसोड : गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त निघालेल्या श्रींच्या पालखीने रिसोड नगरी दुमदुमून गेली होती. स्थानिक गजनान महाराज मंदिरात ७ फेब्रुवारी रोजी गजाजन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ठळक मुद्दे‘श्रीं’चा प्रकट दिन उत्साहात