शिरपूरजैन : येथे आषाढी सोहळयानिमित्त ५ जुलै रोजी संत जानगीर महाराज यांच्या चांदीच्या मुखवटयाची भव्य मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये महाराजांचे हजारो भक्त सहभागी झाले होते. आज ५ जुलै पासून शिरपूर येथील जानगीर महाराज संस्थानवर आषाढी सोहळयास सुरुवात झाली. हा सोहळा १२ जुलै पर्यंत चालणार असून लगेच १२ जुलै ते १९ जुलै या कालखंडात संत ओंकारगिर बाबा यांचा पुण्यातिथी सोहळा साजरा केला जाणार आहे. या अगोदर ५ जुलै रोजी संत जानगीर महाराज यांच्या ७ किलोचा चांदीचा मुखवटा खामगावहून येथून आणण्यात आला. या मुखवटयाची स्थानिक रिसोड फाटयापासून भव्य मिरवणुक काढण्यात आली. प्रथम संस्थानचे मठाधिपती महेशगिर बाबा यांच्या हस्ते मुखवटयाचे पूजन करण्यात आले. या मिरवणुकीमध्ये डझनावर भजनी दिंडयासह हजारो महिला व पुरुष भक्तांनी भाग घेतला होता. मिरवणुक बसस्थानकमार्गे पोलिस स्टेशनसमोरुन जानगीर महाराजांचे समकालिन मित्र मुस्लीम संत हजरत मिर्झा बाबा यांच्या दग्र्यात नेण्यात आली.तेथे दग्र्याच्या वतीने मुखवटयाचे पूजन करण्यात आले. मिरवणुक इरतकर वेटाळ मार्गे चिंचेच्या झाडापासून जानगीर महाराज संस्थानवर पोहाचल्यावर विसजिर्त करण्यात आली. तत्पुर्वी मिरवणुकीतील भाविकांसाठी दिनकर पुंड व इरतकर वेटाळातील युवकांनी चहापाणाची व्यवस्था केली होती.सदर मिरवणुकी दरम्यान सहायक पोलिस निरिक्षक कमलेश खंडारे व बिट जमादार राजेंद्र गोदारा यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
संत जानगीर महाराज मुखवटा मिरवणुकीस जनसागर उसळला
By admin | Published: July 05, 2014 10:46 PM