लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना जानेवारी २०१९ पासून सातव्या वेतन आयोगानुसार वेतन अदा करण्याबाबत ग्रामविकास विभागाने निर्देशित केले आहे. यासाठी मार्च २०१९ या महिन्याचे सातव्या आयोगानुसार वेतन निश्चित करून जानेवारी २०१९ ते मार्च २०१९ या तीन महिन्याच्या थकबाकीसह अनुदानाची मागणी नोंदविण्याच्या सुचनाही देण्यात आल्या; परंतु अद्याप पश्चिम वºहाडातील शिक्षक संवर्गातील जि. प़ कर्मचाºयांची वेतन निश्चितीच होऊ शकली नाही.शिक्षक संवर्गातील जि.प. कर्मचाºयांची ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करण्याची कार्यवाही करून त्यांना जानेवारी २०१९ देय फेब्रुवारी २०१९ या महिन्याच्या वेतनापासून रोखीने लाभ देण्याच्या सुचना ग्रामविकास विभागाने २० फेब्रुवारी २०१९ च्या निर्णयाद्वारे दिल्या होत्या. ही वेतननिश्चितीची ही कार्यवाही माहे मार्च २०१९च्या वेतनापासून रोखीने वेतन देण्याबाबत करण्याचेही शासन निर्णयात नमूद आहे. जिल्हा परिषद स्तरावर शिक्षणाधिकाºयांनी या निर्णयाची दखल घेत सर्व पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाºयांना पत्र पाठवित शासन निर्णयानुसार वेतननिश्चितीची कार्यवाही करण्यासह जानेवारी २०१९ ते मार्च २०१९ या महिन्यापर्यंतच्या थकबाकीसह अनुदानाची मागणी नोंदविण्याच्या सुचनाही दिल्या होत्या. वाशिम जिल्हा परिषदेंतर्गत शिक्षणाधिकाºयांनी यासाठी २५ एप्रिल २०१९ पर्यंतची मुदत इेताना यास विलंब होणार नसल्याची दक्षता घेण्याच्या सुचना गटशिक्षणाधिकाºयांना केल्या होत्या. आता शासन निर्णयानुसार ७ व्या वेतना आयोगानुसार वेतन निश्चिती करून एप्रिल २०१९ पासून त्याचा लाभ शिक्षक संवर्गातील कर्मचाºयांना मिळणे अपेक्षीत असताना एप्रिल महिना संपला तरी, ७ व्या वेतन आयोगानुसार शिक्षक संवर्गातील कर्मचाºयांची वेतननिश्चितीच झालेली नाही. हजारो शिक्षक संभ्रमात पडले आहेत. मार्च महिन्याच्या वेतनाचा खोळंबाशिक्षक संवर्गातील जि.प. कर्मचाºयांची ७ व्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चिती झाली नाही. त्यात मार्च महिन्याच्या वेतनासाठी निधीही नसल्याने शिक्षकांचे वेतन खोळंबले आहे. दरम्यान, शिक्षकांना ७ व्या वेतन आयोगानुसार लाभ देण्यासाठी त्याच आधारे निधीची मागणी पंचायत समितीस्तरावरून करण्यात आली आहे. त्यामुळे या महिन्यात शिक्षकांना ७ व्या वेतन आयोगाचा लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे.
सातव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून, शिक्षकांना शासन निर्णयानुसार एप्रिल महिन्याच्या वेतनापासूनच लाभ देण्यात येईल. याबाबत सर्व गटशिक्षणाधिकाºयांना सुचित करण्यात आले आहे.- अंबादास मानकरशिक्षणाधिकारी (प्राथमिक)जि.प. वाशिम