निवेदनात नमूद केले आहे की, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन व पशुधन विकास अधिकारी गट ‘अ’ सेवा प्रवेश नियम सुधारणा प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यातील सेवाप्रवेश नियमात पदविका, प्रमाणपत्रधारक पशुवैद्यकांसाठी पदोन्नतीचा कोटा अस्तित्वात आहे. त्यामुळे या पदांचे सेवा प्रवेश नियम तयार करताना समितीत संघटनेला स्थान मिळावे, अशी मागणी करण्यात आली होती; मात्र पशुसंवर्धन आयुक्तांनी दोन्ही पदांच्या प्रस्तावित सेवाप्रवेश नियमातील पदविका, प्रमाणपत्रधारकांसाठी असलेला पदोन्नतीचा कोटा व तरतूद पूर्णपणे रद्द केली. पशुधन विकास अधिकारी पदाच्या सुधारित सेवा प्रवेश नियमात पदविका प्रमाणपत्रधारकांसाठी असलेला १५ टक्के कोटा रद्द केला. ही बाब गंभीर व संतापजनक असल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले. याप्रकरणी न्याय देण्यात यावा व इतरही विविध स्वरूपातील मागण्या तत्काळ पूर्ण कराव्यात, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने दिला आहे.
पशुचिकित्सा व्यवसायी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:31 AM