वाशिम : जिल्ह्यात १५ व १६ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कारंजा तालुक्यातील बेंबळा नदीच्या काठावर वसलेल्या शेमलाई या गावातील ४६ घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने त्यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. दरम्यान, या कुटूंबांना तातडीची मदत म्हणून प्रतिकुटूंब ८ ते १० हजार रुपये सानुग्रह अनुदान वाटप केले जाणार असल्याची माहिती कारंजाचे तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.कारंजा तालुक्यातून वाहणाºया बेंबळा नदीच्या काठावर वसलेल्या शेमलाई या छोट्याश्या गावात अनेक गोरगरिब कुटूंब विटा-मातीच्या कच्चा घरांमध्ये वास्तव्याला आहेत. बेंबळा नदी या गावाच्या लागूनच वाहते. त्यामुळे नदीला पूर आला की त्याचे पाणी थेट संपूर्ण गावातही शिरते. तशीच परिस्थिती यंदा १५ व १६ आॅगस्टला उद्भवली. यावेळी गावकºयांनी तडकाफडकी घरदार सोडून समाजमंदिरात आश्रय घेतला. मात्र, पुराच्या पाण्यात घरांमधील संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. आता परिस्थिती पुर्वपदावर आली असून सर्व कुटूंब आपापल्या घरांमध्ये परतले आहेत. दरम्यान, कारंजा महसूल विभागाकडून गावाला भेट देवून पाहणी करण्यात आली. संबंधित बाधीत कुटूंबांना संसारोपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी तातडीची मदत म्हणून सानुग्रह अनुदान वाटप करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली. याशिवाय अतिवृष्टीमुळे तालुक्यातील तीन घरांची पूर्णत: पडझड झाली असून संबंधितांनाही महसूल विभागाकडून अर्थसहाय्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे बाधित कुटूंबांना मिळणार सानुग्रह अनुदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 1:54 PM
या कुटूंबांना तातडीची मदत म्हणून प्रतिकुटूंब ८ ते १० हजार रुपये सानुग्रह अनुदान वाटप केले जाणार असल्याची माहिती कारंजाचे तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.
ठळक मुद्दे बेंबळा नदीच्या काठावर वसलेल्या शेमलाई या गावातील ४६ घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने त्यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य वाहून गेले.संसारोपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी तातडीची मदत म्हणून सानुग्रह अनुदान वाटप करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.