माधवराव पाटील विद्यालय येथे जयंतीनिमित्त संत सेवालाल महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक उपेंद्र पाटील, शिक्षक माणिक डेरे, किशोर जाधव, योगेश गहुले, पवन पाटील, निरंजन उपाधे, संतोष गावंडे, रघू भगत आदी उपस्थित होते. किशोर जाधव यांनी संत सेवालाल महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे मुख्याधापक प्रसेन भगत यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन केले. यावेळी सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. वसंतराव विद्यालय, वरोली येथे विद्यार्थ्यांनी वेशभूषा केली होती. मुख्याध्यापक योगेश देशमुख यांच्यासह शिक्षकांची यावेही उपस्थिती होती. एलएसपीएम हायस्कूल, धामणी मानोरा येथे संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका सुधा इंगोले, प्रा. संजय हांडे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालय, मानोरा येथे संत सेवालाल महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षक कर्मचारी यांची उपस्थिती होती. आपास्वामी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शेंदुरजना (आढाव) येथे संस्थेचे अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब काळे, सदस्य दिलीप पाटील, प्राचार्य रघुनाथ उखळे, उपप्राचार्य चिंचोले, सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. काशिबाई राठोड, विद्यालय सोयजना येथे संत सेवालाल जयंती साजरी करण्यात आली. मुख्याधापक विजयकांत इंगळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा शिवाजीनगर धामणी येथेही जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच माणुसकीचा विद्यार्थी या उपक्रमाचा पाचवा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी केंद्रप्रमुख सुधीर काळे, मुख्याधापक, शिक्षक उपस्थित होते.