१५ एप्रिल रोजी राज्य शासनाचे अवर सचिव र. सि. जरांडे यांनी विधिवत शासननिर्णय (जीआर) काढून कुटुंब व बालकल्याण योजनेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मागणी मान्य केली आहे. सदर मागणीसाठी अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार ॲड. किरणराव सरनाईक यांनी अधिवेशन काळात मुंबई येथे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. सेवानिवृत्त योजना कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल या कर्मचाऱ्यांनी आमदार सरनाईक यांचा सत्कार केला. कुटुंब व बालकल्याण योजनेतील सेवानिवृत्त कर्मचारी हुकूमचंद बागरेचा, सुशीला गोटे, वाय. पी. अडागळे, लीला बक्षी, प्रभा पाटील, शशिकला देशपांडे, लीला पोहरे, पंचफुला नाथे, नलिनी गोस्वामी, छाया लामखांडे, मंदा देशमुख, लीला पुरी, अश्विनी खन्ना, छाया बिटोडकर, निर्मला बागरेचा, संध्या आढाव, कौशल्या काकडे आदींनी आमदार सरनाईक यांचा सत्कार केला. यावेळी मनोज गोटे, मफतलाल त्रिवेदी, शिखरचंद बागरेचा आदी उपस्थित होते.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केला सरनाईक यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 4:40 AM