कारंजा तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंच पदाची निवडणूक मंगळवार १६ फेब्रुवारी रोजी झाली. यात ९ सरपंच आणि १० उपसरपंचांची निवड अविरोध झाली. त्यात सोहळ येथील ग्रामपंचायत सरपंचपदी अरुण पंजाबराव सोळंके अविरोध निवडून आले, तर उपसरपंच पदाच्या निवडणुकीत चंदन वसंता बोलके हे अविरोध विजयी झाले. तर गायवळ ग्रामपंचायतीत सरपंचपदी पुष्पा अरुण राऊत तर मंगला बाळकृष्ण व्यवहारे उपसरपंचपदी अविरोध निवडून आले. सिरसोली येथे सरपंचपदी रेखा प्रभाकर रामटेके, तर उपसरपंचपदी महेंद्र कराळे अविरोध निवडून आले. कोळी ग्रा.पं.पदी शेख साजेदाबी नासीर सरपंचपदी, तर उपसरपंचपदी रामकुशन फुके अविरोध विजयी झाले, भडशिवणी सरपंचपदी वर्षा अबळकर अविरोध, तर उपसरपंचपदी रवींद्र लाहे हे विजयी झाले. काली येथे सरपंचपदी बेबी समाधान लोडम अविरोध तर सीमा वाघमारे या अविरोध विजयी झाल्या. तर रामनगर येथे सरपंचपदी उमिता नितीन चव्हाण आणि उपसरपंचपदी पंकज चौधरी हे विजयी झाले. राहटी येथे सरपंचपदी माधुरी किशोर देशमुख अविरोध तर उपसरपंच पदावर श्रीकृष्ण चिंचे हे अविरोध विजयी झाले. मोहगव्हाण येथील सरपंचपदी भीमराव श्यामराव अवताडे तर उपसरपंचपदी निरंजन किसन जाधव हे अविरोध निवडून आले. मेहा सरपंचपदी प्रतिभा प्रमोद बोबडे निवडून आले, तर उपसरपंचपदी रेखा अशोक मेश्राम या अविरोध विजयी झाल्या. तर दुघोरा सरपंचपदी ज्योती दीपक बांडे हे विजयी झाले तर उपसरपंचपदी विवेक चिंतामण बांडे अविरोध आले. येवता येथे रूपेश देवानंद वानखडे सरपंचपदी, तर नंदा संतोष बांडे उपसरपंचपदी विजयी झाले. शिवनगर सरपंचपदी पद्मा छगन बहाळे अविरोध तर उपसरपंच शालिनी लक्ष्मण ठोबरे यांची अविरोध निवड झाली. तर पिपळगाव खु. सरपंचपदी शुभांगी भारत गुजाटे, तर उपसरपंचपदी बेबी पांडुरंग पवार यांची निवड झाली.
कारंजात १४ पैकी ९ ग्रामपंचायतींचे सरपंच अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 4:49 AM