लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील माहुरवेस परिसरात अण्णाभाऊ साठे समाज मंदिराच्या माध्यमातून सन १९८९ पासून अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीचे जतन होत आहे.वाशिम नगर परिषदेने महाराष्टÑ शासनाच्या दोन कोटी योजनेंतर्गत अण्णाभाऊ साठे समाज मंदिराच्या वास्तूचे बांधकाम केले होते. या वास्तूचे उद्घाटन तत्कालीन अर्थ राज्यमंत्री व संयुक्त अकोला, वाशिम जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अनंतराव देशमुख यांच्या हस्ते पार पडले होते. तत्कालीन आमदार भीमराव कांबळे, माजी आमदार व माजी नगराध्यक्ष रामकृष्ण राठी यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली होती. तसेच नगराध्यक्ष एम.एम. इंगोले, तत्कालीन उपाध्यक्ष मो.मोबीन अ. अजीज कुरेशी, तत्कालीन नियोजन व विकास समिती सभापती भाऊराव खरबळकर, तत्कालीन बांधकाम समिती सभापती गुरुबक्ष रामवाणी व तत्कालीन मुख्याधिकारी मा.म. मानकर यांनी यासाठी परिश्रम घेतले होते. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त परिसरातील समाजमंदिरापासून दरवर्षी शोभायात्रा काढण्यात येते. सुशोभित रथामध्ये अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा विराजमान करून बॅन्जो वाद्यासह वाजतगाजत शहरातून शोभायात्रा काढण्यात येते. समाज मंदिर परिसरात मातंग समाजाचे ५०० ते ६०० कुटुंब वास्तव्यास असून, शहरातील मातंग समाजसुद्धा एकत्रित होऊन अण्णाभाऊ साठे यांची जयंती व पुण्यतिथी तसेच विविध धार्मिक सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम पार पाडत असतात.
सन १९८९ पासून शहरात अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतींचे जतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 1:13 AM
वाशिम : शहरातील माहुरवेस परिसरात अण्णाभाऊ साठे समाज मंदिराच्या माध्यमातून सन १९८९ पासून अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीचे जतन होत आहे.
ठळक मुद्देसमाजबांधवांचा सक्रिय पुढाकारयंदाही साजरा होणार सोहळादरवर्षी समाजमंदिरापासून काढण्यात येते शोभायात्रा