शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

पत्रके वाटून दिला जात आहे पाणी बचतीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 12:45 PM

चालुवर्षी वरुणराजाने हुलकावणी दिल्यामुळे जिल्हावासियांना प्राणी प्रश्न भेडसावणार असुन पाण्याचा प्रश्न सर्वासमोर उभा राहणार असल्यामुळे भविष्यातील पाणी टंचाईची तीव्रता कमी करण्याकरिता त्याचे सुयोग्य व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. याकरिता जिल्ह्यातील राजरत्न संस्थेमार्फत जिल्हाभरात पाणी बचतीचा संदेश देत पत्रके वाटुन पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी संस्थेचे प्रतिनिधी लोकआग्रह करीत आहेत

वाशिम : चालुवर्षी वरुणराजाने हुलकावणी दिल्यामुळे जिल्हावासियांना प्राणी प्रश्न भेडसावणार असुन पाण्याचा प्रश्न सर्वासमोर उभा राहणार असल्यामुळे भविष्यातील पाणी टंचाईची तीव्रता कमी करण्याकरिता त्याचे सुयोग्य व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. याकरिता जिल्ह्यातील राजरत्न संस्थेमार्फत जिल्हाभरात पाणी बचतीचा संदेश देत पत्रके वाटुन पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी संस्थेचे प्रतिनिधी लोकआग्रह करीत आहेत.दसरा या सणानिमित्त गाड्या धुण्याकरिता मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी केल्या जाते. पाण्याचे कमी असलेले प्रमाण लक्षात घेता संस्थेच्यावतीने गाड्या धुण्याऐवजी त्या पुसून घ्याव्यात, कुठल्याही ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीत यंत्रणेस संचित करावे, नेहमी पाणी काटकसरीने वापरावे, लागेल तेवढेच पाणी घ्यावेत, पाण्यासाठी भांडणतंटे होवु देवु नयेत, धुण्या भांड्याचे पाणी झाडांना टाकावे, भर पावसाळ्यात जिल्हाभरात तीव्र पाणी टंचाई सदृश चित्र उभे असुन वेळीच सजग होवुन पाण्याची बचत केल्यास पाणी टंचाईवर थोड्यातरी प्रमाणात काय होईना मात करणे शक्य होईल. असा संदेश पत्रकाच्या माध्यमातून संस्थेचे प्रतिनिधी शहर तसेच ग्रामीण भागात जावुन देत आहेत. पाणी हे नैसर्गीक देण आहे, पाणी हेच जीवन आहे. त्याला मोठ्या प्रमाणात कृत्रीम पध्दतीने बनविता येत नसल्यामुळे पाण्याचे महत्व संस्थेचे प्रतिनिधी पटवुन देत आहेत. जिल्ह्यातील सर्व सूज्ञ नागरिकांनी या बाबीचा थोडातरी विचार करुन पाणी बचत करावी असे आवाहन राजरत्न संस्थेचे विनोद पट्टेबहादूर, भगवान ढोले, अरविंद उचित, सत्येंद्र भगत, अविनाश नाईक, प्रशांत राठोड, विकास पट्टेबहादूर, हंसीनी उचित आदिचे वतीने करण्यात येत आहे. भविष्यातील पाणी टंचाईवर थोड्या प्रमाणात काय होईना मात करणे शक्य होईल. प्रशासनाला सहकार्य करण्याकरिता पाणी बचत करणे काळाची गरज असून या संस्थेने राबविलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.-------------------यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे उन्हाळयापूर्वीच भीषण पाणी टंचाईची शक्यता नाकारता येत नाही. यावर उपाय म्हणून संस्थेची सभा घेवून याबाबत जनजागृती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आता घरोघरी जावून पाणी बचतीबाबत जनजागृती करतांना नागरिकांकडून मिळत असलेले सहकार्य व उपक्रमाची स्तुती होत आहे.- भगवान ढोलेसदस्य, राजरत्न संस्था