वाशिम, दि. १२- मोठेगाव (ता. रिसोड) येथील विवाहिता मृत्यूप्रकरणाचे चांगलेच पडसाद उमटायला लागले असून अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष विजयकुमार कांबळे आणि सदस्य (विधी) न्यायमूर्ती सी.एल. थूल या प्रकरणासंदर्भात तपासणी आणि चौकशीसाठी सोमवार, १३ मार्चपासून वाशिमच्या दौर्यावर येत आहेत.आयोगाचे अध्यक्ष व सदस्य दोघेही १३ मार्च रोजी वाशिममध्ये येणार असून सर्किट हाऊसमध्ये रात्रभर मुक्काम करून मंगळवार, १४ मार्च रोजी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, समाज कल्याण सहायक आयुक्त यांच्यासमवेत मोठेगाव (ता. रिसोड) कडे प्रयाण करतील. तेथील विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी तिच्या कुटुंबीयांना भेट व चौकशी करणार आहेत. तेथेच प्रशासकीय अधिकार्यांसमवेत चर्चा व मार्गदर्शन करून दुपारी वाशिम सर्किट हाऊस येथे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मोठेगाव प्रकरणाचा तपास करणार्या तपासणी अधिकार्यांसोबत चर्चा करतील, असा एकंदरित दौरा जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आला आहे.
एससी, एसटी आयोगाचे अध्यक्ष, विधी सदस्य आज वाशिममध्ये
By admin | Published: March 13, 2017 2:20 AM